राखी सावंतने मानले मॅक्‍डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार

ड्रामा क्‍वीन राखी सावंतचे लग्न ठरले आहे, असे नुकतेच समजले आहे. दीपक कलालबरोबर 31 डिसेंबरला ती विवाहबद्ध होणार आहे. हा विवाह समारंभ लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. त्याच दरम्यान राखीने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आपल्याला मॅक्‍डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शुभेच्छा मिळाल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी आपल्या पाहुण्यांसाठी एक चार्टर विमान पाठवण्याचे मान्य केल्याचेही तिने सांगितले. तिला डोनाल्ड ट्रम्प म्हणायचे होते का, मॅक्‍डोनाल्ड कंपनीच्या ट्रम्प नावाच्या अन्य कोणाबद्दल ती बोलत होती, अशी शंका आता वाटायला लागली आहे.

डोनाल्ड या नावाची तिने मॅक्‍डोनाल्ड अशी विनोदी खिल्ली उडवल्याने आता ट्रोल होण्याची वेळ राखीवर आली आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी वेडिंगसाठी बहुतेकवेळा सव्यसाची मुखर्जी किंवा मनिष मल्होत्राकडून ड्रेस डिजाईन करून घेतले जातात. मात्र त्यांच्याकडून साडी डिजाईन करून घेण्यापेक्षा आपण निर्वस्त्र लग्नासाठी उभे राहू असे धाडसी विधानही राखीने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये केले आहे. तिच्या लग्नाला तिने फारच मोजक्‍या लोकांना निमंत्रण दिले आहे. त्यामध्ये करण जोहर, खली आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)