राखी सावंतने ठरलेले लग्न मोडले

दीपक कलालसोबत लग्न करणार असल्याची घोषणा ड्रामा क्वीन राखी सावंतने केल्यानंतर एकच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राखी सावंतने लग्न पत्रिका देखील शेअर केली होती. पण याला काही दिवस उलटले नसताना राखीने एक व्हिडिओ पोस्ट करत दीपक कलालवर आरोप केले आहेत. आपल्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ राखीने शेअर केला आहे.

ती यामध्ये दीपक आणि आपल्या नात्याविषयी प्रश्न उपस्थित करत आहे. त्याला मी ब्लॉक करेन असे ती या व्हिडिओमध्ये सांगत आहे. दीपक मला माफ कर, माझा परिवार माझ्यावर खूप नाराज आहेत. जे काही झाले ते त्यांना अजिबात आवडलेले नाही. मी 14-15 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. यासाठी मी खूप वर्षे मेहनत केली आहे. मला अशाप्रकारची कोणतीही घाणेरडी गोष्ट करायची नाही. मी माझ्या परिवाराला संभाळत असल्यामुळे मला अशी वाईट पब्लिसिटी नको आहे. दरम्यान, राखी सावंतच्या या व्हिडिओवर युजर्स तिला ट्रोल करत आहेत. राखीच्या या व्हिडिओला देखील तिचा पब्लीसिटी स्टंट म्हटले जात आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)