मुस्लीम बॉयफ्रेंडमुळे सुनैनावर भडकले राकेश रोशन

मुंबई – अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन काश्मीरी पत्रकार रूहैल अमीनसोबतच्या नात्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या या नात्यामुळे तिला खूप त्रास दिल्याचा आरोप सुनैनानं केला असून रूहैल एक मुस्लीम व्यक्ती असल्यानं माझे कुटुंबीय त्याला स्वीकारायला तयार नाहीत असंही तिनं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Weekend is here and it’s time for some BFF moments!!

A post shared by RUHAIL (@ruhail.amin) on


लव्ह जिहादच्या दृष्टीकोनावरही सुनैना आपले मत व्यक्त केले. ‘हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. कोणालाही त्याच्या धर्मावरून बोलणे हे खरं तर अपमानकारक आहे आणि यावर सर्वांनीच आवाज उठवायला हवा.’ यासोबतच आपण सुनैनाला एका कंपनीसाठी एंटरटेनमेंट कव्हर करतेवेळी भेटलो होतो हे सुद्धा कबूल केलं. त्यानंतर काही काळ आमच्यातील संपर्क पूर्णपणे तुटला होता मात्र आम्ही पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलो असं रुहैल यांनी सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by RUHAIL (@ruhail.amin) on

सुनैनाच्या या खुलाशामुळे सर्वांना धक्क बसला असून आता यासंबंधी रूहैलनंही प्रतिक्रिया दिली आहे.माध्यमांशी  बोलताना रूहैल यांनी स्पष्ट शब्दात आपले विचार मांडले. ते म्हणाले, या घटनेनं पुन्हा एकदा आजच्या काळात जुनाट विचार संपले आहेत असं म्हणणाऱ्यासाठी ते आजही तसेच असल्याचं सिद्ध केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)