राज्यसभेच्या उपसभापतीपदी एनडीएचे हरिवंश नारायण सिंह

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदी आज एनडीएचे हरिवंश नारायण सिंह विराजमान झाले. उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत हरिवंश नारायण सिंह यांनी विरोधी पक्षांचे हरिप्रसाद यांच्यावर १२५ मतांनी विजय मिळवला.

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी एनडीएकडून हरिवंश नारायण सिंह तर विरोधी पक्षांकडून हरिप्रसाद यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. या निवडणुकीत हरिवंश सिंह यांना १२५ मते मिळाली. तर हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली. हरिवंश सिंह यांना विजयी घोषित करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जागेवर जाऊन शुभेच्छा दिल्या. याशिवाय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि विरोधी पक्षाचे नेते गुलाब नबी आझाद यांनीही हरिवंश नारायण सिंह यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मतदानावेळी आम आदमी पार्टी (आप), डीएमके, वाईएसआर कॉंग्रेस, पीडीपीसह अनेक पक्ष अनुपस्थित होते. यावेळी राज्यसभेत २४४ खासदारांपैकी एकूण २३० खासदार उपस्थित होते. यामुळे विरोधकांचे संख्याबळ कमी पडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)