राजू शेट्टींचे कोल्हापुरात शक्तिप्रदर्शन !

कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून काँग्रेस – राष्ट्रवादी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय. भव्य रॅलीत राजू शेट्टी यांच्या सोबत किसान संघटनेचे नेते योगेंद्र यादव ,राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील , स्वाभिमानी चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे यांचेसह काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढुन आपला अर्ज भरला.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खासदार राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी हे एकत्र जमले त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात केली दसरा चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि युवक सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी इती सरकारवर टीका करत आमचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला

खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीप्रदर्शन करत असताना या रॅली मध्ये किसान सभेचे दिल्लीचे नेते योगेंद्र यादव हेही सहभागी झाले होते राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी झगडणारा नेता आहे तो विजय झाला तर देशातील प्रत्येक शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे. शेट्टी शेतकऱ्यांसाठी संसदेमध्ये आवाज उठवेल आणि मग शेतकर्‍याना न्याय मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत १ कोटी ५२ लाख ६० हजार २६३ रुपयांची वाढ झाली आहे. शेट्टी यांनी लोकसभा हातकणंगले मतदार संघातून निवडणूकीचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या विवरण पत्रांत ही माहिती दिली आहे. त्यांची २०१४ ला एकूण मालमत्ता ८३ लाख ८७ हजार ७० होती ती आता २०१९ ला २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ इतकी झाली आहे. टक्केवारीचा विचार करता त्यांच्या मालमत्तेत तिप्पट वाढ झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)