राजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड? स्वाभिमानीचा स्वबळाचा नारा

कोल्हापूर – महाआघाडीच्या ऑफरमुळे नाराज असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. कोल्हापूरमध्ये रात्री ५ तास स्वाभिमानीची गुप्त बैठक झाली. यावेळी राजू शेट्टी, रविकांत तुपकर उपस्थित होते.

महाआघाडीने स्वाभिमानीला हातकणंगले एका जागेची ऑफर दिली होती. मात्र राजू शेट्टी तीन जागांच्या मागणीवर ठाम आहेत. यामध्ये बुलढाणा आणि वर्धाचाही समावेश आहे. येत्या २७ तारखेला माढ्यामध्ये स्वाभिमानीचा एल्गार मेळावा तर २८ तारखेला पुण्यात राज्य कार्यकारिणी बैठक होणार आहे. यामध्ये स्वाभिमानी उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)