अमित शहांना कोल्हापुरात येऊ देणार नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर: भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 24 जानेवारीचा दौरा सुरळीत पार पाडायचा असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्‍न निकालात काढावा. अन्यथा शहा यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशन व जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या वतीने 21 जानेवारी रोजी कृषी पंपाच्या वीज दरवाढीविरोधात शिरोली येथे पंचगंगा नदीवर चक्‍काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी मार्केट यार्डमध्ये झालेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील होते.

राजू शेट्टी म्हणाले, सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि त्यानंतर दिलेल्या आश्‍वासनांची आम्ही मोजदादच बंद केली आहे. एकही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही. कोतवालापासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपुढे हे सरकार हतबल होते. मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांकडे राज्यकर्ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे आता या सरकारला कोल्हापुरी हिसका दाखवण्याची वेळ आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)