राजू शेट्टी यांनी घेतली शरद पवारांची भेट

सतेज औंधकर, कोल्हापूर 

भेटी दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा नाही

३० नोव्हेंबरला दिल्ली मधे होणाऱ्या संसद घेराव आंदोलनाला शरद पवार यांना उपस्थित रहावं याच निमंत्रण दिलं-  खासदार राजू शेट्टी 

-Ads-

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार हे दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱयांवर आले आहेत. यानिमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राजू शेट्टी यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांच स्वागत केलं. दरम्यान ही भेट राजकीय नसल्याचं राजू शेट्टी स्पष्ट केलं तसंच ३० नोव्हेंबरला दिल्ली मधे होणाऱ्या संसद घेराव आंदोलनाला शरद पवार यांना उपस्थित रहावं याच निमंत्रण  देण्यासाठी होती असं खासदार राजू शेट्टी सांगितलं.

राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार हे एका लग्न सोहळ्यासाठी दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्त अनेक राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित होत. एरव्ही जाहीर सभेत शरद पवारांच्यावर टीका करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली. कोल्हापूरच्या शासकीय विश्राम गृहात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राजू शेट्टी यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी राजू शेट्टी यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांच स्वागत केलं. यावेळी दोघांच्यात सुमारे 20 मिनिटं बंद खोलीत चर्चा झाली.

ही भेट राजकीय नसल्याचं राजू शेट्टी स्पष्ट केलं तसंच ३० नोव्हेंबरला दिल्ली मधे होणाऱ्या संसद घेराव आंदोलनाला शरद पवार यांना उपस्थित रहावं याच निमंत्रण  देण्यासाठी होती असं खासदार राजू शेट्टी सांगितलं. तसंच दिल्ली मधे होणाऱ्या मोर्चासाठी  शरद पवार स्वतः रस घेवून विरोधी पक्षाच्या नेत्याशी सपर्क करत आहेत. देशातील एकूण  २२ पक्षानी दिल्ली मधल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शरद पवारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.

मी शेतकऱ्यांशी बांधील असून माझी वैयक्तिक भूमिका नाही . संपूर्ण कर्जमाफी आणि दिड पट हमी भाव मिळत असेल तर आम्ही आघाडीत जावु – राजू शेट्टी

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
67 :thumbsup: Thumbs up
4 :heart: Love
3 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
4 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)