राजू शेट्टींनी माढ्यातूनही निवडणूक लढवावी : स्वाभिमानीची जोरदार मागणी

सोलापूर (प्रतिनिधी) – हातकणंगले मतदारसंघासोबतच खासदार राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात होणार आहे. त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्‍यात असलेल्या वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भाषणे सुरू असतानाच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. खासदार शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघासोबतच माढा लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवावी, असा ठराव करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मतदारांनी स्वाभिमानीच्या पारड्यात मतं देऊन राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटील यांचा 20 हजार मतांच्या आतच विजय झाला होता.

त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीकडून माढाची निवडणूक लढवली होती. मात्र, ते भाजपमध्ये गेल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. तर रविकांत तुपकर बुलडाण्यातून निवडणूक लढवणार असल्यामुळे खुद्द राजू शेट्टी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)