उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून कारखान्यांनी गाळप परवाने घेतले : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज साखर आयुक्तांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांबाबत तक्रार केली. साखर आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेमध्ये साखर उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी बोलताना त्यांनी, “एफआरपीची रक्कम ऊस तोडणीनंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देणे कायद्याने बंधनकारक असताना देखील अनेक कारखान्यांनी उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून, साखर आयुक्तांना खोटी माहिती देत गाळपाचे परवाने घेतले आहेत.” असा आरोप केला.

साखर आयुक्तांशी केलेल्या चर्चेबाबत विचारले असता राजू शेट्टी यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांकडून प्रत्येक शेतकऱ्याला एफआरपी दिली आहे असं प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, गाळप परवाना दिलेल्या साखर कारखान्यांची यादी आयुक्तांनी उपलब्ध करून देणे, आणि जे कारखाने गाळप परवान्याशिवाय चालू आहेत त्यांची माहिती साखर आयुक्तांना पुरवणे या बाबींवर चर्चा झाली.”

-Ads-

अन्यथा कारखानदारांचे गुडघे टेकविणार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)