कोल्हापूर – शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत मंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.शेतकऱ्यांची पोरे म्हणणारे पंचतारांकित हॉटले मध्ये राहत आहेत. हे शेतकऱ्यांचे अश्रू पुसत नसून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केलीय.सरकार फक्त दुष्काळ पर्यटन करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.मुख्यमंत्र्यांना बाहेरच्या राज्यात जाऊन प्रचार करायला वेळ मिळतो मात्र दुष्काळ ग्रस्तांचे अश्रू पुसायला वेळ नाही हे दुर्दैवी असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केलाय.
https://youtu.be/320LPzu0nTI
Ads