#video: माढामधून आम्ही जागा लढवू – राजू शेट्टी


पुणे – स्वाभिमानी पक्षाला हातकनंगले, बुलढाणा आणि वर्धा ह्या तीन जागा द्याव्यात. हातकनंगले ही स्वाभिमानी पक्षाची जागा आहे. तर राष्ट्रवादीने बुलढाणा आणि कॉंग्रेसने वर्धा येथील जागा सोडावी. येत्या दोन दिवसात आघाडीने निर्णय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

पुणे येथील पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, माढामधून पवार साहेब निवडणूक लढवणार होते, त्यामुळे आम्ही त्याजागेवर दावा केला नाही. परंतू आता ती जागाही आम्ही लढवू , असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

-Ads-

आमची 15 उमेदवारांची यादी तयार आहे. आघाडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी आघाडीला दिला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)