तब्बल 5 कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याबद्दल अभिनेता राजपाल यादवला 3 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्ली हायकोर्टात याबाबतची सुनावणी सुरु होती. त्या सुनावणी नंतर लगेचच कोर्टाने राजपालला ताबुआत घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधानी 2010 मध्ये “आता, पता लापता’ नावाचा सिनेमा केला होता. त्यासाठी त्यांनी 5 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. राजपालची कंपनीए गौरंग एन्टरटेनमेंटच्या विरोधात मुरली प्रोजेक्टस या फायनान्शियल कंपनीने खटला दाखल केला होता.
यापूर्वीही राजपाल यादववर चेक बाऊन्स होण्याचा एक खटला दाखल झाला आहे. त्या प्रकरणातही राजपाल यादव 6 महिन्यांची शिक्षा झाली आहे. 23 एप्रिल 2018 पर्यंत राजपालवर 11.2 कोटी आणि राजपालची पत्नी राधा यादववर 10 कोटी रुपयांचा दंड लागू झाला होता.
मात्र कोर्टाने 5 हजार रुपयांच्या जामिनावर दोघांची सुटका केली होती. राजपाल यादव सध्यातरी कोणत्याच सिनेमामध्ये दिसत नाही. त्याने स्वतःची प्रॉडक्शन कंपनी काढून मोठा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्त्यात तो अपयशी ठरला होता. आत तरी त्याने स्वतःच्या अभिनयाकडे लक्ष केंद्रीत करायला हवे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा