अर्थसंकल्प देशाचे आणि देशवासीयांचे भविष्य उज्ज्वल करणारा : राजनाथ सिंह

दिल्ली – ‘मोदी-2′ सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (५ जुलै) लोकसभेमध्ये सादर केला. दरम्यान, सादर केलेल्या बजेटवर भाजपच्या राजकीय नेत्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे.

लोकसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचे आणि देशवासीयांचे भविष्य उज्ज्वल करणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अर्थसंकल्प यशस्वी होईल. समाजातील सर्व स्तरांचे हित जपणारा अर्थसंकल्प आहे.
– केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

मॅक्रोइकॉनॉमिक पातळीवर हा एक दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प आहे. याला कोणी भारताला 5 ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पंतप्रधानांनी बाळगलेल्या स्वप्नांचा जाहीरनामाही म्हणू शकेल. तसेच हा गाव, गरीब आणि शेतकरी यांच्यामध्ये रुपांतरण घडवून आणण्याचे ध्येय असलेला अर्थसंकल्प आहे.
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेल्या पाच वर्षात आम्ही आधीच अर्थव्यवस्था दुप्पट केली आहे. त्यानंतर आता मला निश्‍चित खात्री वाटते की, ज्यावेळी आम्ही पुढील पाच वर्षे पूर्ण करु तेव्हा भारताची अर्थव्यवस्था ही 5 ट्रिलिअन डॉलर इतकी झालेली असेल.
– नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री

भारतासारख्या मोठ्या देशाचा अर्थसंकल्प एका महिलेने सादर करावा, ही अभिमानास्पद बाब आहे. एक महिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे, हे पाहून बरे वाटले. नारी ही नारायणी आहे. ही संकल्पना देशवासीयांच्या मनात रुजली की, महिलांवर होणारे अत्याचार कमी होतील, अशी आशा आहे.
– खासदार हेमा मालिनीनवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)