राजनाथ सिंह बांग्लादेश दौऱ्यावर

नवी दिल्ली: केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह आजपासून ३ दिवसीय बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. राजनाथ सिंह आपल्या ३ दिवसीय दौऱ्यांमध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एकमेकांना सहकार्य, रोहिंग्या मुस्लिमांच्या स्थलांतराने निर्माण झालेल्या समस्या इत्यादी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत. आपल्या ३ दिवसीय दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची देखील भेट घेणार आहेत.
बांगलादेश व भारताच्या ऐतिहासिक संबंधाचा दाखला देत राजनाथ सिंह यांनी बागलादेश आणि भारत हे देश संस्कृती, भाषा आणि लोकशाही या मूल्यांद्वारे एकमेकांशी जोडले गेले असल्याचे ट्विट द्वारे सांगितले. राजनाथ सिंहांचा बांगलादेश दौरा द्विपक्षीय संबंध आणखीन दृढ करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)