ईशान्य भारतातील फुटीरतावादाचे प्रमाण घटले

नवी दिल्ली – ईशान्य भारतातील फुटीरतावादाचे प्रमाण गेल्या साडेचार वर्षांमध्ये बरेच कमी झाले आहे. परिस्थिती बरीच सुधारली असून स्थानिक जनता प्रशासन आणि सेनादले यांच्याशी अधिक विश्वासाने सहकार्य करीत आहेत. मात्र काश्‍मीरमधील परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सांगितले.

गेल्या साडेचार वर्षांमध्ये काश्‍मीरमध्ये शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असला तरी अद्यापही तेथे दहशतवाद्यांचे वास्तव्य आणि त्यांची यंत्रणा आहे. केंद्र सरकार कठोर कारवाई करून ती मोडून काढल्याखेरीज राहणार नाही, असे ते म्हणाले.

काश्‍मीर खोऱ्य़ात अजूनही दहशतवादी कारवाया होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तेथील फुटीरतावादी शक्ती भारतविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांची शक्ती क्षीण झाली असली तरी ती पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. खोऱ्य़ात आजही काही ठिकाणी दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे, हल्लेखोर गट आणि लॉंचिंग पॅडस्‌ अस्तित्वात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)