राजनाथ सिंह यांनी केरळमध्ये पूरग्रस्तांना १०० कोटी रुपये मदत केली घोषित

नवी दिल्ली: केरळमध्ये पेरीयार नदीमध्ये धरणाचे पाणी सोडल्याने अनेक ठिकाणी सार्वजनिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी पूरग्रस्तांना 100 रुपये मंजूर केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज केरळमध्ये पूरग्रस्तांचे हवाई सर्वेक्षण केले. त्यांच्याबरोबर पर्यटन मंत्री के. एल. अल्फान्स आणि गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे केरळमधील 14 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे.

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (केएसडीएमए) च्या नियंत्रण कक्षानुसार राज्याच्या राजधानीतील 1,031 हेक्टर (2547.66 एकर) पिकांचे नुकसान झाले आहे.

केरळमध्ये पेरियार नदीच्या खोऱ्यामधील पूरग्रस्तांच्या आश्रय छावण्यांमध्ये आतापर्यंत 10 हजार नागरिकांनी आश्रय घेतला आहे. एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये 78 आश्रय छावण्या उघडण्यात आल्या असून दोन मुख्य धरणांमधून पाणी सोडले जाण्याच्या पार्श्‍वभुमीवर संभाव्य परिस्थितीबाबत खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना या आश्रय छावण्यांमध्ये हलवले जात आहे. पारावूर, अलुवा, कानायान्नूर आणि कुन्नाथुनाद तालुक्‍यांमध्ये या आश्रय छावण्या उघडण्यात आल्या आहेत. या आश्रय छावण्यांमध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

पेरीयार नदीमध्ये धरणाचे पाणी सोडल्याने अनेक ठिकाणी सार्वजनिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर आलुवा येथे भगवान शंकराच्या कारक्किदाका वारु बाली या यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या यात्रेमध्येही अडथळे आले आहेत. हे मंदिर मंगालप्पुझा आणि पेरियार या दोन नद्यांदरम्यानच्या वाळूच्या बेटावर आहे. या दोन्ही नद्यांना पूर आल्याने मंदिरात पाणी घुसले आहे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)