राजमाता विजयाराजे सिंधिया

राजमाता विजयाराजे सिंधिया या ग्वाल्हेर राजघराण्याच्या स्नुषा. स्वातंत्र्योत्तर भारतातील दुसऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुना लोकसभा मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवली आणि विजयी होत संसदेत प्रवेश केला. विजयाराजे या दोन वेळा राज्यसभा सदस्यही राहिल्या. कुशल संघटक असणारी महिला म्हणूून भारतीय राजकारणात त्यांची नोंद आहे. त्यांनी राजेशाही थाट-बाट यांचा त्याग करून जनसेवेमध्ये आपले जीवन व्यतीत करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

विजयाराजे यांचे शालेय शिक्षण वाराणसीमधील ऍनी बेझंट थियोसोफिकल शाळेमध्ये झाले. तर लखनौमधील आयटी कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. 1942 मध्ये त्यांचा विवाह झाला आणि त्या ग्वाल्हेर राजघराण्यात आल्या. पण स्वातंत्र्यानंतर लगेचच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी राजेशाही जीवन सोडले आणि राजकारणात सक्रिय झाल्या. आकर्षक व्यक्‍तिमत्त्व असणाऱ्या राजमाता विजयाराजे या ओजस्वी वक्‍त्या होत्या. त्यांना लेखन आणि वाचनामध्ये विशेष रुची होती. “द लास्ट महारानी ऑफ ग्वाल्हेर’ हे इंग्रजीतील आणि “लोकपथ से राजपथ’ हे हिंदीतील त्यांचे पुस्तक चांगलेच चर्चिले गेले.

राजमाता विजयाराजे या कोणत्याही पक्षात असल्या तरी त्या नेहमी निवडणुका जिंकतच आल्या आहेत. विजयाराजेंनी 1957 नंतर 1962 मध्ये दुसऱ्या लोकसभेसाठी ग्वाल्हेरमधून कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. 1967 मध्ये त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि स्वतंत्र पार्टीमधून लोकसभेची निवडणूक लढवली. पुढे त्या जनसंघात सहभागी झाल्या. 1971 च्या निवडणुका त्यांनी गुना मतदारसंघातून जनसंघाच्या उमेदवार म्हणून लढवल्या आणि जिंकल्याही. 1980 मध्ये भाजपाचा उदय झाल्यानंतर ते अखेरपर्यंत पक्षाच्या अग्रणी नेत्यांमध्ये सहभागी राहिल्या. विश्‍व हिंदू परिषदेतही त्या बराच काळ सक्रिय होत्या.

जीवनप्रवास
– विजयाराजेंचा जन्म 12 ऑक्‍टोबर 1919 रोजी झाला.
– 1941 मध्ये त्यांचा विवाह जीवाजीराव सिंधियांशी झाला.
– 1975 मध्ये आणीबाणीदरम्यान त्या 19 महिने तिहार तुरुंगात होत्या.
– 1978 मध्ये त्या राज्यसभेच्या सदस्य बनल्या.
– 1980 मध्ये इंदिरा गांधींविरोधात त्यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवली; पण त्यांना पराभव पत्करावा लागला.
– 1989, 1996 आणि 1998 मध्ये त्या भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवून विजयी झाल्या.
– 25 जानेवारी 2001 रोजी त्यांचे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)