राजमाता जिजाऊ संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

पुणे : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे 39 येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलाच्या संघाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर तसेच शंकरराव मोहिते स्कूल व ज्युनिअर कॉलेज अकलूज यांच्या सयुंक्त विद्यमाने दि.17 व18 नोव्हेंबर 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या शालेय विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सोलापूर ग्रामीण संघाला 72 धावांनी पराभूत करून पिंपरी चिंचवड विभागाला प्रथमच विजेतेपद मिळवून दिले.

सोलापूर ग्रामीण संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर गोलदांजी घेण्याचा निर्णय घेतला व पिंपरी चिंचवड विभागाचे प्रतिनिधीत्व करताना राजमाता जिजाऊ संघाने फलंदाजी स्विकारून 10 ओव्हर मध्ये 2 बाद 130 धावाचे आव्हान सोलापूर ग्रामीण संघाला दिले होते. त्यात यश जगदाळे याने 26 चेंडूत 39 नाबाद धावा 2 झेल घेतले . पुलकेश हलमूणी  4 चेंडूत 6 धावा करून झेलबाद झाला व त्याने 2 विकेट घेतल्या. अमन मुल्ला याने 7 चेंडूत 15 धावा करून झेलबाद झाला व 1 विकेट घेतली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना  रोहित हाडके (कर्णधार) याने 21 चेंडूत 57 नाबाद धावा व त्याने एकूण सामन्यात 7 षटकार व 2 चौकार मारत प्रेक्षकांची वाहवा मिळवून संघाच्या धावसंख्येला 130 पर्यंत पोहोचवले.

त्या नंतर विजयासाठी 131 धावांचा पाठलाग करताना सोलापूर ग्रामीण संघ 10 षटकात 4 बाद  58  धावाच करू शकला. त्यामुळे राजमाता जिजाऊ संघ 72 धावांनी एकतर्फी विजय मिळवून आजपर्यंतच्या इतिहासात क्रिकेट स्पर्धेत पिंपरी चिंचवड विभागाला प्रथमच विजेतेपद संपादन करून दिले.

त्यापुर्वी झालेल्या उपांत्यफेरीत सोलापूर शहर संघाचा 117 -89 धावाच्या गुणफलकाने 28 धावाच्या फरकाने विजय संपादन केला. तत्पूर्वी झालेल्या उंपात्यफेरीच्या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने सोलापूर शहर संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

या स्पर्धेत पुणे शहर,पुणे ग्रामीण,नगर शहर, नगर ग्रामीण,सोलापूर शहर,सोलापूर ग्रामीण व पिंपरी चिंचवड या 7 जिल्ह्यातून 7 संघ सहभागी झाले होते. त्यात पिंपरी चिंचवड चे प्रतिनिधित्व करत महाविद्यालयाच्या संघाने दिमाखदार विजय संपादन केला.

राजमाता जिजाऊ च्या कु.रोहित हाडके(कर्णधार), यश जगदाळे,अमण मुल्ला,पुलकेश हलमणी,षिकेश बारणे,अदित्य एकशिंगे,दर्शन वायगंणकर,रोनक हरपळे,संग्राम भोसले,सुमित सांवत,सुशिल आहेर,ओमकार सुतार,तेजस बोचरे,अनिकेत जैस्वाल,सुमित पासवान संघात याचा समावेश होता. या सर्व खेळाडूंची डिसेंबर महिन्यात होणार असलेल्या शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक मा.श्री. प्रा.गोपीचंद करंडे व श्री दत्ताञय वाळके यांनी विशेष मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
24 :thumbsup:
13 :heart:
6 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)