“क्रेडाई’ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी राजीव परीख

पुणे – “क्रेडाई’ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. “क्रेडाई’ महाराष्ट्रची निवडणूक शनिवारी पुण्यात झाली. “क्रेडाई’ महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने परीख यांची दोन वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली. येत्या दि.1 एप्रिलपासून ते पदभार स्वीकारतील.

यावेळी “क्रेडाई नॅशनल’चे चेअरमन गीतांबर आनंद, “क्रेडाई नॅशनल’चे प्रेसिडेंट इलेक्‍ट सतीश मगर, “क्रेडाई नॅशनल’चे अध्यक्ष जक्षय शहा, “क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया तसेच 51 शहरातील अनेक सदस्य उपस्थित होते.
“बांधकाम व्यवसायात अधिकाधिक सुशासन, सुसूत्रता, झिरो डीले पॉलिसी, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा उपयोग करून बांधकाम खर्च कमी करून नफा कसा वाढवता येईल यासर्व बाबींवर प्रामुख्याने लक्ष देण्यात येईल. याशिवाय तसेच प्लॉटिंग डेव्हपमेंट, स्कील डेव्हपमेंट, कर विषयक सुधारणा यासारख्या विषयांवर देखील जास्तीत जास्त मार्गदर्शन विकसकांना मिळावे असा मानस आहे,’ असे परीख यांनी यावेळी सांगितले.

 

 उपाध्यक्ष, कार्यकारिणीचीही निवड

2019 -21 या कालावधीसाठी “क्रेडाई- महाराष्ट्र’च्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका याचवेळी झाल्या. त्यात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात सुनील फुरडे (सोलापूर), महेश साधवानी (नागपूर), रसिक चौव्हाण (नवी मुंबई), श्रीकांत परांजपे (पुणे), प्रफुल्ल तावरे (बारामती), रवी वट्‌मवार (औरंगाबाद) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सुनील कोतवाल (नाशिक) यांची सचिव पदी आणि गिरीश रायबागे (कोल्हापूर) यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आली. संयुक्त सचिवपदी अनिश शाह (जळगाव), महेश यादव (कोल्हापूर), दीपक मोदी (माळेगाव), विकास लागू (सांगली), राज्य सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी शैलेश वानखेडे (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली.
 
नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन

“क्रेडाई नॅशनल’चे चेअरमन गीतांबर आनंद यांच्या हस्ते क्रेडाई महाराष्ट्राच्या नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन झाले यावेळी, “क्रेडाई नॅशनल’चे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्‍ट सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यावेळी उपस्थित होते. बांधकाम व्यवसायाशी निगडित सर्व महत्वाची ऑफिसेस पुण्यातच असल्यामुळे पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी क्रेडाई महाराष्ट्रचे ऑफिस होणे आवश्‍यक होते. हीच गरज लक्षात घेऊन पुणे कॅंपमधील न्यूक्‍लियस जीजीभाय टॉवरच्या सहाव्या मजल्यावर हे कार्यालय घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)