राजस्थानचे अंतिम बलाबल

जयपुर: राजस्थान निवडणुकीचे सर्व निकाल आता अधिकृतपणे जाहीर झाले असून 99 जागा मिळवणारा कॉंग्रेस पक्ष हा या राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. येथे 199 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते व स्पष्ट बहुमतासाठी 101 जागांची गरज आहे. कॉंग्रेसला त्यासाठी केवळ दोन जागांची आवश्‍यकता आहे.

या राज्यांत बहुजन समाज पक्षाला 6, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला 2, अपक्षांना 13 आणि अन्य पक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला केवळ 73 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. बहुमताच्या आकड्यापासून हा पक्ष खूपच दूर असल्याने येथे कॉंग्रेसला बऱ्याच अंशी राजकीय स्थिरता लाभणार आहे. मध्यप्रदेशात मात्र कॉंग्रेससाठी तशी स्थिती नाही. तेथे भाजपही बहुमतापासून केवळ सहा जागाच दूर आहे आणि तेथे अन्य पक्षांची किंवा अपक्ष आमदारांची संख्या मोठी नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या तुलनेत राजस्थानात अन्य पक्षांचे चौदा आमदार जरी आयत्यावेळी पलटले तरी तेरा अपक्षांपैकी कोणत्याही दोन आमदारांची साथ मिळवणे कॉंग्रेसला अवघड नसल्याने राजस्थानात कॉंग्रेसला आपले सरकार स्थीर ठेवणे हे तुलनेने सोपे असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)