राजस्थान सरकारचा १०० दिवसीय कृती आराखडा लवकरच : सचिन पायलट 

जयपूर : राजस्थानचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज पत्रकारांशी बोलताना, ‘राजस्थान सरकार लवकरच आपला १०० दिवसीय कृती आराखडा तयार करणार असून जनतेच्या हितार्थ सरकार मधील सर्वच मंत्री कसोशीने प्रयत्न करतील’ अशी ग्वाही दिली.

काल मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली होती. या भेटीमध्ये खातेवाटपासंबंधीचे निर्णय घेण्यात आले होते. खाते वाटप पार पडल्यानंतर सचिन पायलट यांनी आज सचिवालयामध्ये जाऊन पदभार स्वीकारला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “खातेवाटपासंबंधित निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करूनच घेतले गेले आहेत.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“जनतेने आमच्या बाजूने कौल दिला असून आता आम्ही जनतेच्या हितासाठी काम करण्यास बांधील आहोत. आमच्या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे तरुण आणि अनुभवी नेत्यांचा योग्य समतोल आहे. आम्ही सामूहिक नेतृत्वाच्या आधारे शासन अधिक कार्यक्षम बनवणार आहोत.” असे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)