उघड्यावर लघुशंका करतानाचा भाजप मंत्र्याचा फोटो व्हायरल, म्हणाले ‘ही तर जुनी परंपरा’

अजमेर – काही महिन्यांतच राजस्थानमध्ये  निवडणूका होणार आहेत. अशामध्ये पुन्हा एकदा राज्यात सत्ता मिळविण्यासाठी भाजपा जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री पक्षाची प्रतिमा खराब करत आहेत. दरम्यान राजस्थान सरकारमधील मंत्री शंभू सिंह खातेसर यांचा एक फोटो सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ते एका भितींचाअाडोसा घेऊन लघुशंका करत आहेत. ते ज्याठिकाणी लघुशंका करत आहेत, त्या भिंतीवर मुख्यमंत्री वसुंधरा राजे याचे एक पोस्टर लागले आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर शंभू सिंह याच्यांवर चहुबाजूंनी टीका होत आहे. सोशल मीडियावर सुध्दा अनेकानी टीका करत चांगलेच सुनावले आहे. तसेच अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यासंबंधी मंत्री शंभू सिंह यांनी उघड्यावर लघुशंका करणे ही आपली जुनी परंपरा असल्याचे म्हटलं आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानाबाबत बोलताना ते म्हणाले की, उघड्यावर शौच करणे आणि लघुशंका करणे यात फरक आहे. उघड्यावर शौच केल्यास रोगराई निर्माण होते. तर उघड्यावर लघुशंका करणे मोठी गोष्ट नाही. मोकळ्या जागी उघड्यावर लघुशंका केल्याने रोगराई पसरत नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी ज्याठिकाणी लघुशंका केली त्याच्यापासून काही अंतरावर भाजप पक्षाची सभा होती. सभेत अडीच लाख लोक उपस्थित होते, तरीदेखील त्यांना याबदल काहीच चुकीचे वाटत नाही. त्यांनी म्हटलं की, मी जिथे लघुशंका केली तिथे दूरपर्यत कुठेही मुतारी नव्हती त्यामुळे नाईलाजाने मला उघड्यावर लघुशंका करावी लागली.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. तसेच सोशल मीडियावरून देखील मंत्री शंभू सिंह आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)