राजस्थान पोलीस करणार आपल्याच ठाण्यांचे स्टिंग ऑपरेशन

जयपूर (राजस्थान): राजस्थान पोलीस आपल्याच पोलीस ठाण्यांचे स्टिंग ऑपरेशन करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षकाला आदेश देण्यात आला आहे, की आपल्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे महिन्यातून किमान एकदा तरी स्टिंग़ ऑपरेशन करावे. त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणी, नाकाबंदी, घटनास्थळाची तपासणी त्वरित करावी.

सर्व पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना महिन्यातून किमान एकदा स्टिंग ऑपरेशन करण्याचे आदेश दिल्यचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक (दक्षता) गोविंद गुप्ता यांनी सांगितले आहे. 5 आणि 7 जानेवारीला राजस्थानमधील 7 पोलीस ठांण्यांचे स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर हा आदेश देण्यात आलेला आहे. पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यासाठीे येणारांशी उचित वर्तणूक, एफआयआर दाखल करून घेणे, वेळेवर कारवाई करणे याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. त्या दृष्टीने दक्षता शाखेकडून 5 आणि 7 जानेवारीला करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या धर्तीवर पोलीस अधीक्षकांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यांचे वेळोवेळी स्टिंग ऑपरेशन करण्यात यावे.

दक्षता शाखेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या वेळी सात पैकी पाच ठाण्यांमध्ये वाहन चोरीची तक्रार नोंदवून घेताना टाळाटाळ केलेली दिसून आली आहे. एके ठिकाणी तर तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीला ठाणेदाराने फारच वाईट वागणूक दिल्याचे दिसले. त्या ठाणेदाराला पदावरून काढून टाकण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)