राजस्थान सरकारचा गुज्जरांना पाच टक्के आरक्षणाचा प्रस्ताव

जयपुर – पाच टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या गुज्जर समाजाला न्याय देण्यासाठी तसा प्रस्ताव राजस्थान सरकारने आज विधानसभेत आज मंजुर केला, गुज्जर समाजाबरोबरच अन्य चार जातींनाही आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने विधानसभेत मंजुर केला आहे.

तथापी या समाजाने मात्र आपले आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. त्याच्या अंमलबजावणीचे काम महत्वाचे आहे असे या समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान राजस्थान सरकारने म्हटले आहे की आम्ही विधानसभेत आरक्षणाचा प्रस्ताव मंजुर करून तो केंद्र सरकारकडे सादर केला आहे. आता केंद्र सरकारने त्यावर निर्णय घ्यायचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

किरोरीसिंह बैंसला यांच्या नेतृत्वाखाली गुज्जर समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी सवाई माधवपुर आणि राजस्थानात अन्य ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी अनेक ठिकाणी रास्तारोको आणि जाळपोळ करून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने हा प्रस्ताव विधानसभेत सादर करून त्याला मंजुरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)