रजनीकांत यांनी पुन्हा टाकले बुचकळ्यात

चेन्नाई  – अभिनेते रजनीकांत यांनी काल भाजपच्या संबंधात एक विधान केल्यानंतर त्यांनी आज त्याचा खुलासा करतानाही पुन्हा माध्यमांच्या प्रतिनिधींना बुचकळ्यात टाकणारी विधाने केली आहेत. त्यामुळे त्यांचा भाजप किंवा मोदींविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे की नाही हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे.

भाजप हा धोकादायक पक्ष आहे असे विधान त्यांनी केल्याचे काल प्रकाशित झाले आहे. त्यावर खुलासा करताना रजनीकांत म्हणाले की अन्य राजकीय पक्षांसाठी ते धोकादायक ठरत आहेत असे त्या राजकीय पक्षांचे म्हणणे आहे ते माझे म्हणणे नाही. ते धोकादायक आहेत की नाहीं हे लोकांनाच ठरवू दे. एका व्यक्ती विरूद्ध दहा जण एकत्र येऊन लढत आहेत. त्यावरून कोण प्रबळ आहे ते लोकच ठरवतील असेही बुचकळ्यात टाकणारे विधान त्यांनी आज पुन्हा एकदा केले.भाजप माझ्या मागे आहे असे लोक म्हणत असले तरी ते खरे नाही असेही त्यांनी लगेच स्पष्ट केले.

एका माणसाच्या विरोधात दहा जण एकत्र येत आहेत याचा अर्थ कोण प्रबळ आहे हे तुम्हीच ठरवा असे विधान त्यांनी केल्यानंतर पत्रकारांनी तुम्ही मोदींना प्रबळ मानता काय? असा थेट प्रश्‍न विचारला. त्यावर उत्तर देतानाही त्यांनी मला ते स्पष्ट करता येणार नाही असे उत्तर दिले.

रजनीकांत यांनी राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले असले तरी त्यांनी अजून स्वत:ची नेमकी राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी सतत अटकळी बांधल्या जात आहेत. पण अजूनही त्यांनी लोकांना त्याविषयी संभ्रमातच ठेवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)