‘आरआरआर’मधील एका सीनसाठी राजामौली मोजणार ‘इतके’ रुपये

“बाहुबली’ डायरेक्‍टर एसएस राजामौली यांचा आगामी बिग बजेट असलेल्या “आरआरआर’ हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात असलेले स्टार कास्टमुळे चाहत्यांची उत्सुकता खूपच वाढलेली आहे. यात राम चरण, ज्यूनियर एनटीआर, आलिया भट्‌ट आणि अजय देवगण यासारखे दिग्गज कलाकार काम करत आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि संजय दत्त यांना अप्रोच करण्यात आले होते. तसेच या दोन्ही कलाकारांनी प्रॉजेक्‍टसाठी होकारही दर्शविला होता. मात्र, त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील एक सीन सुट करण्यासाठी आलेल्या खर्चामुळे हा चित्रपट पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

 

View this post on Instagram

 

Already receiving a lots of abbreviations for our title #RRR in different languages. Keep them coming with #RRRTitle.

A post shared by RRR Movie (@rrrmovie) on


या चित्रपटाचे काम राजामौली यांनी सुरू केले असून या चित्रपटातील एक ऍक्‍शन सीक्‍वेंसचे चित्रिकरण करण्यात येणार आहे. राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर यांच्या या सीनसाठी तब्बल 45 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे बोलले जात आहे. या सीनमध्ये अन्य 2 हजार लोकांचा सहभाग असणार आहे. दरम्यान, हा पीरियॉडिग ऍक्‍शन ड्रामा असलेला “आरआरआर’ चित्रपट एकाच वेळी 10 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 30 जुलै रोजी जगभरात रिलीज करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)