अजय देवगनने नाकारला राजामौलीचा बिग बजेट चित्रपट

बॉलीवूडमध्ये “बाहुबली’सारखा सुपरहिट चित्रपट देणारे डायरेक्‍टर राजामौली हे त्यांच्या आगामी “आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात साउथचे दोन सुपरस्टार राम चरण आणि ज्यूनिअर एनटीआर एकत्रित स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटातील एका मुख्य भूमिकेसाठी काही दिवसांपूर्वी अजय देवगण याला अप्रोच करण्यात आले होते. ही भूमिका अजयने साकारावी असे राजामौली यांना वाटत होते. मात्र, अजयने चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.

राजामौली यांच्या तमिल ब्लॉकबस्टर “ईगा’ (मक्‍खी)च्या हिंदी रीमेकसाठी अजय देवगण आणि काजोल यांनी आपला आवाज दिला होता. त्यानंतर राजामौली यांनी अजय देवगणला आपल्या आगामी चित्रपटात एक खास भूमिका करण्याची ऑफर दिली होती. मात्र, अजय अन्य चित्रपटात व्यस्त असून बिझी शेड्यूलमुळे त्याने नकार दर्शविला आहे.

दरम्यान, अजय देवगणकडे सध्या अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. या कारणामुळे तो अन्य कोणताही चित्रपट साईन करू इच्छित नाही. अजयने आतापर्यत साउथच्या दोन चित्रपटांची ऑफर नाकारली आहे. यापूर्वी त्याला कमल हसनने “इंडियन 2′ चित्रपटासाठी ऑफर दिली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)