राज ठाकरे आज उत्तर भारतीयांशी संवाद साधणार 

मुंबई: परप्रंतीय विशेषत: उत्तर भारतीयांच्या विरोधाभोवती राजकारण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या (रविवार) उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने राज काय बोलणार आणि राज यांच्याविषयी उत्तर भारतीयांच्या मनात असलेले गैरसमज दूर होणार काय? याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

उत्तर भारतीय महापंचायतीने कांदिवलीत एका संवाद सभेचे आयोजन केले आहे. कांदिवली पश्‍चिम येथील इराणीवाडीतील भुराभाई हॉलमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या संवाद सभेला राज ठाकरे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. आपापसातील गैरसमज दूर व्हावेत आणि संवादाचा सेतू निर्माण व्हावा या हेतूने महापंचायतीने राज यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.

-Ads-

शिवसेनेत असताना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी सातत्याने भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात परप्रांतीयांना विशेषत: उत्तरप्रदेश आणि बिहारींना लक्ष्य केले. अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा असो की छटपूजा राज यांनी नेहमीच उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना अनेकदा मारहाण केली आहे. उत्तर भारतीय मुंबईत येऊन मतदारसंघ बांधत आहेत, असा आरोपही राज यांनी केला होता. यापार्श्वभूमीवर उत्तर भारतीयांच्या मंचावरील राज यांच्या उपस्थितीला राजकीय महत्त्व प्रप्त झाले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पुणे, नाशिक आदी शहरी भागात मनसेचा प्रभाव आहे. याच शहरी पट्ट्यात उत्तर भारतीयांचा टक्का दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मतांच्या राजकारणातील उत्तर भारतीयांचे महत्त्व लक्षात घेऊन राज हे आपला परप्रंतीय विरोधी सूर मवाळ करू शकतात, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)