मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. राज ठाकरे फॅक्टर सुद्धा या निवडणुकीत अपयशी ठरला. पराभवानंतर विरोधकांच्या बैठका वाढल्या असून काल मुंबईत महाआघाडीची संयुक्त बैठक पार पडली यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी विधानसभा सोबत लढवणार असल्याचे स्प्ष्ट झाले.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचालींना सुरुवात झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काल धनंजय मुंडे यांच्या निवास्थानी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत सुद्धा काही नेत्यांनी राज ठाकरेंना आघाडीत घेण्याची मागणी केली.