राज बब्बर मोरादाबाद ऐवजी फतेहपुर सिक्रीतून लढणार

File photo

लखनौ – कॉंग्रेसने उत्तरप्रदेशातील आपले नऊ उमेदवार जाहीर केले असून त्यांनी मोरादाबाद मतदार संघातील उमेदवार आयत्यावेळी बदलला आहे. त्या मतदार संघात आधी उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर हे निवडणूक लढवणार होते पण त्यांनी तेथून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने त्यांना आता फतेहपुर सिक्री मतदार संघातून पक्षाने उमेदवार जाहीर केले आहे. आता इम्रान प्रतापगडीया हे मोरादाबाद मधून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील.

राज बब्बर यांनी आग्रा मतदार संघातून सन 1999 आणि सन 2004 मध्ये निवडणूक जिंकली होती पण सन 2008 साली झालेल्या फेररचनेत आग्रा मतदार संघ अनुसुचित जातींसाठी राखीव ठेवला गेला. त्यानंतर बब्बर यांना फिरोजाबाद मध्ये उमेदवारी दिली गेली ती जागाही त्यांनी जिंकली होती.

बरेली मतदार संघातून प्रवीण अरों यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी याच मतदार संघातून सन 2009 साली निवडणूक जिंकली होती. बालकुमार पटेल यांना बांदा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे ते उत्तरप्रदेशातील प्रख्यात माजी डाकू शिवकुमार पटेल उर्फ ददूआ याचे लहान बंधु आहेत.

बालकुमार पटेल हे समाजवादी पक्षाचे माजी खासदार आहेत, त्यांनी नुकताच कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता.आग्रा राखीव मतदार संघातून प्रीत हरित, हरदोई मधून विरेंद्रकुमार वर्मा, कौशंबी मधून गिरीश चंद पसी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)