अयोध्येत राम मंदिर उभारल्यास बंधुभाव वाढेल : रिझवी 

नवी दिल्ली – अयोध्यातील वादग्रस्त ठिकाणी राम मंदिराची उभारणी झाल्यास देशात शांतता निर्माण होवून बंधुभावही वाढेल. त्यामुळे देशातील मुसलमान सुखा-समाधानाने, सुरक्षित आणि सन्मानाने राहतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सय्यद गैरूल हसन रिझवी यांनी केले आहे. तसेच हिंदू-मुसलमानातील संबंध मजबूत होण्यासाठी लवकर निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

अयोध्या प्रकरणाचा हवाला देत काही मुस्लिम संघटनांनी आयोगाला अर्ज दिला आहे. याप्रकरणी आयोगाने मध्यस्थी करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. अल्पसंख्यक आयोग 14 नोव्हेंबर रोजी आपल्या पहिल्या मासिक बैठकीत या अर्जांवर विचार करेल आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला याप्रकरणी त्वरीत निर्णय घेण्याची विनंती करण्याची शक्‍यता आहे.

रिझवी म्हणाले की, राष्ट्रीय अल्पसंख्याक कल्याणकारी संस्था तसेच आणखी काही संघटनांनी आमच्याकडे अर्ज दिले आहेत. सध्या मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण असून आयोगाने अयोध्या प्रकरणात मध्यस्थी केल्यास वातावरण सुरळीत होईल, असेही ते म्हणाले. या संघटनांच्या मते मुस्लिम समाजाने राम मंदिर उभारु द्यावे. त्याचबरोबर भविष्यात याप्रकरणी दुसरा कोणता वाद निर्माण होऊ नये, याची दक्षताही घ्यावी.

माझे ही हेच मत आहे की, अयोध्येमध्ये ना कधी मशीद बनू शकते ना नमाज होऊ शकेल. हे स्थान 100 कोटी हिंदूंच्या भावनांशी निगडीत आहे. त्यासाठी ही जमीन राम मंदिरासाठी हिंदूंकडे सोपवली पाहिजे. त्यामुळे मुसलमान सुखा-समाधानाने, सुरक्षित आणि सन्मानाने राहू शकतील. तसेच देशाच्या विकासाचे भागीदार बनू शकतील, असेही रिझवी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)