विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

पुणे – राज्यातील वातावरणात सध्या वेगाने बदल होत आहे. किमान तापमानात चढ-उतार होत असताना, आता पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, बुधवारी विदर्भ अणि मध्य महाराष्ट्रात काही भागांतील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

दोन दिवस तापमानात घट झाल्याने राज्यातील उत्तर भागांत गारठा वाढला आहे. त्याचबरोबर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट झाली आहे. सकाळी गारवा दुपारी ऊन आणि संध्याकाळी पुन्हा थंड वारे असेच वातावरण अनुभवायला मिळत आहे. तसेच, कमाल तापमानात सुद्धा वाढ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी पुणे शहरात 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)