पावसाळा आणि कीटकजन्य आजार (भाग- ३)

डॉ. मानसी पाटील

काळा आजार हा विशिष्ट प्रजीवाच्या (एकच पेशी असलेल्या जीवाच्या, प्रोटोझूनच्या) संसर्गामुळे निर्माण होणारा रोग असून त्यात प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) अनियमित ज्वर व अतीव अशक्तता असते. या रोगाला डमडम ताप, बरद्वान ताप अशी दुसरी नावे असून भारताच्या पूर्व भागात त्याचा फार प्रसार आहे. भूमध्यसमुद्राचा किनारा, सूदान, पश्‍चिम व पूर्व आफ्रिका, दक्षिण शिया, उत्तर चीन आणि ब्राझील येथेही हा रोग आढळतो. काळा आजार हे नाव मूळ भारतीय असून या नावावरून रोगाचे मारकत्व दिसून येते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिवताप अर्थात मलेरिया

हिवताप हा परजीवी रोग जीवघेणा ठरू शकतो. हा रोग प्लाज्मोडीयम विवियाक्‍स (पी. विवियाक्‍स), प्लाज्मोडीयम मलेरीई (पी. मलेरीई) आणि प्लाज्मोडीयम ओव्हेल (पी. ओव्हेल) या विषाणूंमुळे होतो. अनाफीलीस नावाच्या डासाच्या संक्रमणात्मक चाव्यातून तो पसरतो.
संसर्गक्षम डासानं चावा घेतल्यानंतर 10 ते 14 दिवसांनंतर माणसाला हा रोग होतो. माणसाला होणाऱ्या हिवतापाच्या परजीवींचे दोन प्रकार आहेत, प्लाज्मोडीयम विवियाक्‍स आणि प्लाज्मोडीयम फाल्सीपारम. भारतामधे हे दोन्ही सहजपणे आढळून येतात. मानवी शरीराच्या आत, हा परजीवी त्याच्या गुंतागुंतीच्या जीवनचक्राचा भाग म्हणून अनेक बदलांमधून जातो (प्लाज्मोडीयम हा एक आदिजीव परजीवी आहे)
हा परजीवी आपलं जीवनचक्र यकृताच्या पेशींमधे (प्री-एरिथ्रोसायटीक स्कीझोगोनी) आणि रक्‍तपेशींमधे (एरिथ्रोसायटीक स्कीझोगोनी) पूर्ण करतो. प्लाज्मोडीयम फाल्सीपारमव्दारे होणारा संसर्ग सर्वात जीवघेण्या स्वरुपाचे असतो.

मलेरियाची लक्षणे

सामान्यतः हिवतापामुळे ताप, डोकेदुखी, उलट्या आणि इतर फ्लूसारखी लक्षणे दिसतात. हा परजीवी लाल रक्‍तपेशींना संक्रमित करून नष्ट करतो त्यामुळे अशक्‍तपणा, चक्‍कर येणे / मळमळणे आणि शुद्ध हरपणे यांच्यामुळे सहजपणे थकवा येतो.

परजीवी हे रक्‍तातून मेंदूपर्यंत (सेरेब्रल मलेरिया) आणि इतर महत्त्वाच्या अवयवांकडे वाहून नेले जातात. गर्भधारणेच्या दरम्यान हिवताप झाल्यास आईला, गर्भाला अथवा नवजात बाळाला मोठा धोका होऊ शकतो. गर्भवती महिला हिवतापाचा सामना करण्यात आणि जंतुसंसर्ग हटवण्यामध्ये कमी सक्षम असतात, त्यामुळे गर्भावर विपरित परिणाम होतो.

तीव्र आणि गुंतागुंतीच्या हिवतापाची लक्षणे

तातडीची गरज म्हणजे गंभीर स्वरूपाच्या हिवतापाची चिन्हे आणि लक्षणे लवकर समजून घेणे आणि रुग्णाला तत्काळ आपत्कालीन सेवा पुरवणे. जी चिन्हं आणि लक्षणं निदानासाठी वापरली जातात ती अ-विशिष्ट असतात आणि गाठ तयार करणाऱ्या कोणत्याही गंभीर रोगामुळे होऊ शकतात उदा. तीव्र हिवताप, अन्य तीव्र गाठीचा रोग किंवा सहगामी हिवताप आणि तीव्र विषाणू संसर्ग.

काय असतात लक्षणे हिवतापाची?

नीट बसू न शकणे, भान नसणे किंवा बेशुध्दी. श्‍वसनाला त्रास होणे, तीव्र अशक्‍तपणा, सामान्य मळमळणे / फिट येणे, पातळ पदार्थ पिण्याची क्षमता नसणे / उलट्या होणे, गडद रंगाची आणि / किंवा कमी प्रमाणात लघवी होणे, बसण्याचा आणि / किंवा श्‍वासाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना, शक्‍य असेल तर, आंत्रेतर हिवतापविरोधी आणि प्रतिजैविक औषधांचा उपचार द्यावा. तोंडावाटे उपचार शक्‍य तितक्‍या लवकर सुरू करून ते सतत दिले जाण्याची खात्री करावी. प्रयोगशालेय मानकांवर वारंवार देखरेख ठेवणे अत्यावश्‍यक आहे. रक्‍तातील साखर, रक्‍तातील युरिया, द्रवांचे संतुलन, संबंधित संसर्ग इत्यादी. आतड्यातील रक्‍तस्त्राव वाढवणारी औषधे टाळावीत.

गंभीर स्वरूपाची गुंतागुंत होण्याचा धोका

प्रसाराचे प्रमाण कमी असलेल्या क्षेत्रात – सर्व वयोगटाच्या लोकांना हा रोग होऊ शकतो परंतु प्रौढांना अति तीव्र आणि विविध गुंतागुंती होऊ शकतात. भारतामध्ये एकंदरीने प्रसाराचे प्रमाण सामान्यतः कमी आहे परंतु ईशान्येकडील राज्ये आणि ओरीसा, छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेशाच्या मोठ्या भागांमधे ते तीव्र आहे.

प्रसाराचे प्रमाण अधिक असलेल्या क्षेत्रात – 5 वर्षांखालील मुले, पर्यटक, स्थलांतरीत मजूर. गर्भवती असण्याशी संबंध – गर्भवतींना मलेरियाच्या संसर्गाचा सामना करणे अवघड असते व ह्यामुळे पोटातील बाळावर वाईट परिणाम होतात.

हिवतापाला कारणीभूत ठरणारे कीटक

अनाफीलीस क्‍युलीसीफॅसीस हा हिवतापाचा प्रमुख कारक कीटक आहे.
हा एक लहान ते मध्यम आकाराचा डास असून त्याची बसण्याची पद्धत क्‍युलेक्‍ससारखी असते. खाण्याची पध्दत ही एक वनस्पतीवर आधारित प्रजाती आहे. ज्यावेळी यांची संख्या अति प्रमाणात वाढते तेव्हा ते अधिक प्रमाणात मानवांच्या रक्‍तावर जगतात.

विश्रांतीची पद्धत

मानवी घरांमधे आणि पाळीव प्राण्यांच्या गोठ्यात दिवसा विश्रांती घेतो. पुनरुत्पादनाच्या जागा पावसाचं साठलेलं पाणी आणि छोटी तळी, चर, नदीच्या पाण्याची डबकी, कालवे, गळणारे पाणी, भाताची शेतं, विहिरी, तलावांच्या कडेला, वालुकामय काठ असलेले साठलेले झरे. मोसमी पाऊस झाल्यानंतर ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

चावण्याची वेळ

प्रत्येक कीटकाच्या चावण्याची वेळ ही त्यांच्या अनुवांशिक गुणधर्मानुसार ठरते, परंतु वातारणाच्या स्थितीचा त्याच्यावर तत्काळ प्रभाव पडतो. अनाफीलीस क्‍युलीसीफॅसीससह बहुतांश कीटक, संध्याकाळ झाली की लगेच चावायला सुरुवात करतात. त्यामुळे, हिवाळ्यात उन्हाळ्याच्या तुलनेनं ते लवकर चावायला सुरुवात करतात परंतु त्यांचा सर्वाधिक चावण्याचा काळ हा प्रजातींनुसार वेगवेगळा असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)