पावसाळा आणि कीटकजन्य आजार (भाग- २)

डॉ. मानसी पाटील

काळा आजार हा विशिष्ट प्रजीवाच्या (एकच पेशी असलेल्या जीवाच्या, प्रोटोझूनच्या) संसर्गामुळे निर्माण होणारा रोग असून त्यात प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) अनियमित ज्वर व अतीव अशक्तता असते. या रोगाला डमडम ताप, बरद्वान ताप अशी दुसरी नावे असून भारताच्या पूर्व भागात त्याचा फार प्रसार आहे. भूमध्यसमुद्राचा किनारा, सूदान, पश्‍चिम व पूर्व आफ्रिका, दक्षिण शिया, उत्तर चीन आणि ब्राझील येथेही हा रोग आढळतो. काळा आजार हे नाव मूळ भारतीय असून या नावावरून रोगाचे मारकत्व दिसून येते.

जपानी विषमज्वर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डुकरांमध्ये जपानी तापाचे विषाणू मोठया प्रमाणात असतात. क्‍युलेक्‍स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो. हे डास डुकरांना चावतात. डुकरांना मात्र या विषाणूपासून काहीही अपाय होत नाही. लोकांना जपानी ताप रोग कसा होतो, तर जपानी तापाच्या विषाणूंनी संसर्गग्रस्त झालेल्या डासांच्या चावण्यामुळे होतो.

प्रसारणाचे मूलभूत चक्र कसे असते ?

जपानी तापरोगाच्या विषाणूंचे संसर्ग झालेल्या पाळीव डुकरांचे आणी जंगली पक्षांचे रक्‍त पिऊन डास संसर्गग्रस्त होतात. त्यानंतर त्यांच्या रक्‍त शोषणाच्या दरम्यान हे डास जपानी तापरोग माणसांमध्ये पसरवतात. पाळीव डुकरे आणि जंगली पक्षी यांच्या शरीरात हा विषाणू अनेकपटीने वाढतो.

जपानी तापरोगाचा विषाणू हा एक व्यक्‍तीकडून
दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गग्रस्त होत नाही. उदाहरणार्थ, ज्याला हा रोग झाला आहे त्याला स्पर्श करुन किंवा त्याचे चुंबन घेऊन अथवा हा रोग झालेल्या रुग्णाची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याकडून तो आपणांस रोगग्रस्त करत नाही. केवळ पाळीव डुकरे आणि जंगली पक्षी हेच जपानी तापरोगाचे वाहक आहेत.

जपानी तापरोगाची लक्षणे

डोकेदुखीसह तापाशिवाय सहज लक्षणांच्या शिवाय सौम्य संसर्ग होतात. अधिक तीव्र संसर्गाची लक्षणेही चटकन दिसतात आणि डोकेदुखी, उच्च ताप, मान अखडणे, स्तब्ध होणे, भान न राहणे, बेशुध्दी, कधीतरी मळमळणे (विशेषतः लहान मुलांमधे) आणि अंगग्रही (परंतु क्वचितच शिथिल) अर्धांगवायू होतो.

जपानी तापरोगाचा परिपक्‍वतेचा काळ किती आहे?

डुकरांना चावलेले डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा 9 ते 12 दिवसांनंतर माणसांमध्ये जपानी तापरोग दिसू लागतो. या विषाणूंची बाधा झालेले मादी डास पुढील डासांच्या पिढीतसुद्धा या विषाणूंचा प्रसार करतात. ज्या भागात स्थलांतर करणारे बगळयासारखे पक्षी काही काळ वास्तव्य करतात, तेथेही या पक्ष्यांकडून व डासांमार्फत या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या रोगाचा अधिशयन काळ 5 ते 15 दिवस असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)