पावसाळा आणि अस्थमा (भाग-१)

डॉ. राजेंद्र माने

प्रदूषित वातावरणामुळे फुप्फुसांचे आरोग्य बिघडण्याचा मोठा धोका देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. फुप्फुसांच्या आजारांमधील दमा हा एक दीर्घकाळ चालणारा आजार आहे. पावसाळा सुरु झाला की अस्थमा/दमा यात वाढ होते आणि मग रुग्णाचा त्रास वाढत रहातो.

 

कबुतरांच्या विष्ठेमुळे फुप्फुसाचा दाह करणा-या जीवाणूचा शरीरात प्रवेश होतो. परिणामी श्वसनाच्या अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. त्यातूनच अस्थमा बळावतो.
वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. 2020 साली भारत ही अस्थमा रुग्णांची जागतिक राजधानी बनेल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या आजाराला अनेक धोकादायक घटक कारणीभूत असले तरी एका निरीक्षणात मुंबई व ठाणे शहरात वाढत असलेले वायू प्रदूषण आणि कबुतरांची वाढती संख्या हे सुद्धा महत्त्वाचे कारण समोर येत आहे.

दमा या आजाराची मुख्य लक्षणं पुढीलप्रमाणे-

  • सतत खोकला येणं
  • धाप लागणं
  • श्वासोच्छ्शास करताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणं
  • श्वास बाहेर सोडण्यास त्रास होणे
  • छातीवर वजन पडल्यासारखं वाटणं

कबुतरांच्या सततच्या संपर्कामुळे सर्वच वयोगटांतील व्यक्तींना श्वसन विकारांचा त्रास होत आहे. घरातील बाल्कनी व खिडक्‍या येथील कबुतरांची विष्ठा वाळत घातलेल्या कपडयांसोबत घरामध्ये येते व त्यामुळे अतिसंवदेनशीलता फुप्फुसाचा दाह निर्देशित करणा-या जीवाणूचा आपल्या शरीरात प्रवेश होतो व त्यामुळे श्वसनाच्या अनेक आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

भारतातील सहा मुलांपैकी एका मुलाला दम्याचा त्रास जडतो. सीआरएफ या संस्थेने 2017 साली लहान मुलांच्या आरोग्याची पाहणी केली. या पाहणीत असं दिसून आलं की, त्या सालात लहान मुलांमध्ये दम्याचं 2.5 टक्के एवढं प्रमाण होतं. 2008 मधील पाहणीत मात्र हे प्रमाण 5.5 टक्के झालं होतं. तर 2012 मध्ये या प्रमाणात साधारण आठ टक्क्‌यांपेक्षा अधिक वाढ झाली होती.

2016 साली हे प्रमाण 15 टक्क्‌यांवर आलं असल्याचं भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळेच दमा या आजाराविषयी माहिती करून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. शहरांमध्ये दूषित हवा, बदलते हवामान, मोठया प्रमाणात होणारी बांधकामं या परिस्थितींमध्ये अस्थमा रुग्णांचा त्रास वाढतो. यामुळे अस्थमाच्या रुग्णांना जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे. अस्थमाचा रुग्ण वेळच्या वेळी औषधे घेत असला तरीही धुळीचे कण, धूर, फुलांचे परागकण, थंड हवामान, पित्त, मानसिक ताण, व्यायाम, धूम्रपान अशा गोष्टी अस्थमा बळावण्यास कारणीभूत ठरतात,.

लहानवयात दमा होण्याचं प्रमाण जास्त असतं. याला आपली बदलती खाद्य संस्कृती, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, कम्प्युटर अशा अनेक गोष्टी जबाबदार आहेत. यासाठी पालकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. मुलांकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार वाढू शकतो.

अनेक अस्थमांचे रुग्ण नियमित औषधोपचार करीत नाहीत. यामुळे पुढे हा आजार वाढतो. जीवघेणा ऍटॅक येऊ शकतो. आजारावरील खर्चही वाढतो. म्हणून नियमित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार आवश्‍यक आहे. त्यामुळे पालकांना मुलांमध्ये दम्याची लक्षणं दिसताच त्यांनी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

अस्थमा असल्यास ही काळजी घ्या

मुलाला दम्याचा अटॅक आल्यास सरळ बसू द्या. लगेच झोपवू नका. शांत आणि ढिलेपणाने पडायला सांगा. कपडे सईल करा. डॉक्‍टरांनी सांगितलेली रिलीव्हर औषधे लगेचच द्या. त्यामुळेही सुधारणा नसेल तर आणखी पाच मिनिटांनी रिलीव्हर औषधं थोडया प्रमाणात द्या. तरीही बरं वाटत नसेल तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. याशिवाय मुलाला स्वत:ला अस्थमाविषयी औषधं आणि साधनं (इनहेलर्स, स्पेन्सर्स) कशी वापरावीत, ते शिकवा.

इतर काळजी

आठवडयातून एकदा अंथरूण पांघरूण गरम पाण्याने धुऊन खडखडीत सुकवा. डस्ट फ्री कव्हर्स वापरणं चांगलं. मुलांची खेळणी नीट धुऊन स्वच्छ करता येतील अशीच वापरा. मांजर, कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ जपून करावा. तुमच्या मुलाच्या कीटमध्ये नेहमीच एक रिलीव्हर हॅंडी पॅक ठेवा. शाळेमध्ये तात्काळ वेळेसाठी सूचना तुमच्या टेलिफोन नंबरसहित लिहून द्या. अन्न हवारोधक डब्यांमध्ये ठेवा. दमट जागा जसे की, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह किंवा तळघरात हवा खेळती राहण्यासाठी एक्‍झॉस्ट पंखे लावा. तिथे येणारं शेवाळं नीट धुवून ती जागा पूर्णपणे सुकवा व पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करा, जेणेकरून परत बुरशी येणार नाही. धुम्रपान टाळा. विशेषत: मुलांसमोर व घरात तर कटाक्षाने टाळाच. कारण त्याचा धूर बराच वेळ घरात रेंगाळत राहतो. एखाद्या उत्पादनातील केमिकलची मुलाला ऍलर्जी आहे, असं लक्षात आलं तर ती वस्तू टाळा.

पावसाळा आणि अस्थमा (भाग-२)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)