पावसापासून वाचवणारे विश्‍वसनीय दालन – रमेश डाईंग

पुणे, एकदाची झाली सुरुवात पावसाला! कधी पाऊस येतोय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह पुणेकरही पावसाची अगदी आतुरतेने वाट बघत होते. आता पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणातील असह्य उकाडा कमी होऊन गार, मंद हवेची झुळुक जेव्हा सर्वांगाला झोंबते तेव्हा अंग कसं शहारून उठतं. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलण्याची मोह अशावेळी प्रत्येकाला होतो. वेधशाळेने वर्तविले आहे की जुलैमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे. पावसाच्या बचावासाठी पुण्यातील विश्‍वसनीय दालन म्हणजे सुप्रसिद्ध रमेश डाईंग.

1956 पासून पुणेकरांच्या सेवेत असलेल्या रमेश ड।ईंगने आपल्या वस्तू व सेवेचे वेगळेपण कायम ठेवले आहे. रमेश डाईंगमध्ये कुटुंबातल्या प्रत्येकासाठी दर्जेदार ब्रॅण्डेड रेनकोटस, जॅकेट्‌स, रिव्हर्सिवल रेकोट्‌स, रेन लॉग कोट, विमेन्स बेल्ट टॉप, पॉंचोज, रेनी, कॅप्स, फोल्ड पॉके, अँटिक, कार फॅमिली अंब्रेलाज, ओल्ड पीपल वुडन अंब्रेलाज, ट्रान्स्परंट, रेनकोट, किड्‌स फूल रेनकोट सेट, विंडचीटर्स असे विविध प्रकार रमेश डाईंगमध्ये उपलब्ध आहेत.
सॅक पाठीवर असताना वरून बसू शकेल असा रमेश डाईंगने खास तयार केलेला रेनकोटस विद्यार्थी आणि कॉलेजला जाणाऱ्या तरुण- तरुणींसाठी अगदी योग्य किंमतीत उपलब्ध असल्याने त्याला पुणेकरांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतो आहे. तसेच जयसन्स, रिलायबल, हायलॅंड, वाईल्ड क्राफ्ट, केचुवा आदी ब्रॅंडेड रेनकोट्‌स सोबतच ज्योती, मदरलॅंड, नीलम, हॅपी, ई- सिरीज, अल्बर्टी, बॉसनी, जयसन्स या ब्रॅंडेड छत्र्यांमधून हवा तसा रंग किंवा डिझाईन योग्य मिळण्याची गॅरंटीही रमेश डाईंगने आपल्या ग्राहकांना दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिव्हाळापूर्ण सेवा व होलसेलच्या भावात रिटेल विक्री यामुळे रमेश डाईंग हे किफायतशीर खरेदीसाठी पुणेकरांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. सदाशिव पेठेमध्ये शनिपाराजवळ, कोथरूडमध्ये पौंड रोडला, हडपसरमध्ये भाजी मंडई चौक, सिंहगड रोडला माणिकबाग, औंधमध्ये ब्रेमन चौक, सातारा रोडला एलोरा पॅलेस, डेक्कनला बस स्टॉपजवळ आणि चिंचवडला चाफेकर चौक आदि.

पिंपरी, चिंचवड, हिंजवडी, वाकड व प्राधिकरणमधील लोकांनी चिंचवडच्या रमेश डाईंगच्या शॉपमधून खरेदी करावी.
सर्व ठिकाणी रमेश डाईंगची दालने असून प्रत्येक ठिकाणी भरगच्च व्हरायटीजमधून आपल्याला हवी असलेली वस्तू निवडता येईल. सर्व दालने ही पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे खरेदीसाठी ती सोयीस्कर अशी आहेत, असे आवाहन संचालक प्रथमेश आणि कुशल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)