राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार

संग्रहित छायाचित्र

पुणे – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाल्याने तसेच अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याला आगामी काळात बळकटी मिळणार आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

गेले दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मंगळवारीही सकाळपासून राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते.दुपारी उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात ढगांची दाटी झाली आहे. बंगालच्या उपसागरात सोमवारी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे बुधवारी ठळक झाले होते. त्यामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

-Ads-

त्याचबरोबर कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याला बळकटी मिळणार असल्याने पश्‍चिम किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरही मान्सून सक्रिय होऊन पाऊस वाढण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
14 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
1 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)