पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ

संग्रहित छायाचित्र

पुणे – राज्यात बहुतांश भागांत पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत भूरभूर सोडल्यास ढगाळ हवामान आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागांत ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोकणात कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात 19 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविले गेले.

मंगळवारी (दि. 31 जुलै) राज्यातील अनेक भागांत ढगाळ, काही भागांत कडक ऊन पडल्याची स्थिती होती. गुजरातच्या दक्षिण भागात समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच, उत्तरप्रदेशच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्राचे समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्‍यता आहे. बंगालचा उपसागर ते अमृतसर, बरेली, सुलतानपूर, कोलकता या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)