धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

खेड तालुक्यात आज संततधार पाऊस पडत असल्याने चास कमान धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणातून ५९९३ क्युसेक वेगाने खाली भिमानदीत पाणी सोडण्यात आले.

पुणे- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. दिवसभरात धरण साखळी क्षेत्रात 60 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, चारही धरणे भरल्यामुळे खडकवासला धरणातून शनिवारी (दि. 25) सकाळी पुन्हा पाणी सोडण्यात आले. सध्या 5 हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे.

खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली आहेत. टेमघर धरणाची दुरुस्ती सुरू असल्याने जलसंपदा विभागाने हे धरण पूर्ण न भरण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. त्यामुळे धरणात रोजच्या रोज साठणारे पाणी सोडले जात आहे. मागील आठवडाभरापासून सातत्याने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी धरण क्षेत्रातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला होता. परंतू, मध्यरात्रीपासून पुन्हा जोर वाढला आहे. चारही धरण क्षेत्रांत शनिवार सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत असल्याची माहिती जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार 848 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. पानशेत धरणातून 2 हजार 931, तर वरसगाव धरणातून 2 हजार 664 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. टेमघर धरणातून सलग 3 ते 4 दिवस पाणी सोडण्यात आले. त्यानंतर काल या धरणातून पाणी सोडण्यात आले नाही. सद्य:स्थितीत चार धरणांत 27.76 टीएमसी पाणी साठले आहे. त्याची टक्केवारी 95.22 आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणांत 25.22 टीएमसी पाणी साठले होते. त्याची टक्केवारी 86.52 होती. काल सर्वाधिक 29 मि.मी. पाऊस टेमघर धरण क्षेत्रात पडला, तर सर्वांत कमी 7 मि.मी. पाऊस खडकवासला धरण क्षेत्रात पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे करण्यात आली.

धरणांची सद्य:स्थिती
धरण झालेला पाऊस टीएमसी टक्केवारी
खडकवासला 7 1.97 100
पानशेत 12 10.65 100
वरसगाव 14 12.82 100
टेमघर 29 2.31 62.39

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)