अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे उडाली धांदल

पुणे – मागील आठ दिवसांपासून शहरात संततधार सुरू आहे. शनिवारी (दि.25) दिवसभर अधून-मधून पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे आणि वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात संततधार तर कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्‍यता, भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरी कोसळल्या. कोकण-गोव्यातील भिरा येथे सर्वाधिक 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत प्रमुख शहरात झालेला पाऊस (मिमीमध्ये) – भिरा 70, लोणावळा 60, महाबळेश्‍वर, पोलादपूर येथे 40, चिपळून, खेड, माणगाव, माथेरान, पाली येथे 30 तर जव्हार, कुडाळ, पनवेल, रत्नागिरी, मालवण, पौड, मुळशी, शाहुवाडी येथे 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)