गावागावात ‘निधीची बरसात’ !

एकवीस कोटी मंजूर : जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणार
वडगाव मावळ –
मावळ तालुक्‍यातील विविध विकास कामांसाठी पुणे जिल्हा नियोजन समितीने 21 कोटी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यातील 21 कोटी 21 लाख रुपयांच्या निधीचे रस्ते, अंतर्गत रस्ते, साकव पूल, अंगणवाडी इमारत, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी शेड, स्मशानभूमी सुधारणा, शाळा दुरुस्ती आदी विविध विकास कामे मंजूर केली आहेत.

या संदर्भात मावळ पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि.2) आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलका धानिवले, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, मावळ पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, पंचायत समिती सदस्या निकिता घोटकुले, ज्योती शिंदे, संदीप काकडे, सागर पवार, संतोष कुंभार, नामदेव पोटफोडे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील विविध प्रलंबित कामांसंदर्भात कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महिन्याभरापूर्वी ग्रामपंचायतींच्या आढावा बैठकी घेतल्या होत्या. त्यानुसार बाळा भेगडे यांनी राज्य शासनाकडून विकासकामांसाठी निधी आणल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये 21 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

स्मशानभूमी सुधारण्यासाठी 45 लाख रुपये
पंधरा गावातील स्मशानभूमी सुधारणा कामासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामध्ये लंकेवाडी (घोणशेत), भाजगाव, कटवी, आढळे खुर्द, इंदोरी, उधेवादी, कांब्रे (आंदर मावळ), बऊर, गोडूंब्रे, जांभूळ, वराळे, ताजे, शिलाटणे, चांदखेड.

पंचवीस गावातील शाळा होणार दुरुस्ती
तालुक्‍यात 83 लाख 76 हजार रुपये निधीतून 25 गावातील शाळा दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. गावे व निधी पुढीलप्रमाणे (कंसात मंजूर निधी) : चांदखेड (चार लाख 50 हजार), कडधे (सहा लाख), कुणे-नाणे मावळ (दोन लाख 30 हजार), पिंपलोळी (तीन लाख), वराळे (चार लाख 50 हजार), आर्डव (तीन लाख), भाजगाव (तीन लाख), देवघर (तीन लाख), दिवड (10 लाख 26 हजार), वारू (दोन लाख 30 हजार), येळसे (दोन लाख 20 हजार), ठाकरवस्ती (निगडे) (चार लाख 50 हजार), सावंतवाडी (महागाव) (चार लाख 80 हजार), वडगाव (चार लाख 50 हजार), शिरदे (तीन लाख), वाऊंड (दोन लाख 30 हजार), बेंदेवाडी (तीन लाख), गजानन सोसायटी (दोन लाख 20 हजार), काटेवाडी (एक लाख 50 हजार), शिवली (दोन लाख), जवन नं 3 (दोन लाख 30 हजार), मालेवाडी (दोन लाख 20 हजार), देवले (दोन लाख 30 हजार), नाणे (दोन लाख 10 हजार), कातवी (तीन लाख).

चोवीस गावांत स्मशानभूमी शेड
एक कोटी 34 लाख 40 हजार रुपये निधीतून 24 गावातील स्मशानभूमी शेड कामासाठी प्रत्येकी पाच लाख 60 हजार रुपये निधी मंजूर झाला. यामध्ये टाकवे बुद्रुक, फळणे, शिरदे-जांभवली, आंबी, वारू-ब्राम्हणोली-शिंदेवस्ती, आढळे बुद्रुक, कुसगाव गावठाण (पवन मावळ), महागाव-सावंतवाडी, मोरवे-कोळे चाफेसर, अहिरवडे, करंजगाव-मोरमारेवाडी, कल्हाट-पवळेवाडी, शिलाटणे, कुणेवाडी, भाजगाव, पाले (नाणे मावळ), धनगव्हाण, दहिवली, वाहनगाव, काले, भडवली, जांभवली, शिवली-काटेवाडी, महागाव-धालेवाडी.

ग्रामपंचायत कार्यालयासाठी प्रत्येकी 12 लाख
मावळातील 13 गावांमधील ग्रामपंचायत कार्यालय कामासाठी 1 कोटी, 56 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालय कामासाठी प्रत्येकी 12 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. करुंज, साते, ताजे, तुंग, शिळींब, थुगाव, दारुंब्रे, आपटी धामणदरा, कल्हाट, कुसवली, मळवंडी ढोरे, उकसान व वराळे या गावांचा समावेश आहे.

अंगणवाडीच्या इमारतींकरिता एक कोटी 61 लाख रुपये
एक कोटी 61 लाख 50 हजारांचा निधीतून 19 गावातील अंगणवाडी इमारतीसाठी प्रत्येकी आठ लाख 50 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. वराळे, इंदोरी 3, इंदोरी 4, देवले, माऊ, करंजगाव मोरमारेवाडी, आतवन, धनगव्हाण, नाणे क्र. 1, येलघोल, कुसगाव (पमा), वडेश्‍वर, करंजगाव नवीन पुनर्वसन, नाणे नवीन पुनर्वसन, गोवित्री, आंबी, नानोली, इंदोरी कुंडमळा, नवलाख उंब्रे.

दहा गावांत साकव पूल
65 लाख रुपये निधीतून दोन गावात साठवण बंधारा कामासाठी निधी मंजूर झाला. पुसाणे (35 लाख), टाकवे बुद्रुक (30 लाख). तसेच तीन कोटी पाच लाख रुपये निधीतून 10 गावातील साकव पूल कामासाठी प्रत्येकी 35 लाख रुपये निधी मंजूर झालेली आहेत. बेडसे, आढले खुर्द, आढले बुद्रुक, इंदोरी, कुसगाव बुद्रुक, घोणशेत, मळवली. साकव पूल कामासाठी प्रत्येकी 30 लाख रुपये निधी मंजूर झाले असून, सोमाटणे, मळवंडी ठुले.

26 गावांत साडेसहा कोटींचे रस्ते
सहा कोटी 61 लाख रुपये निधी 26 गावांच्या रस्त्यासाठी मंजूर झाला आहे. गावे व निधी पुढीलप्रमाणे : मळवली – बोरज रस्ता (30 लाख), मळवली – सदापूर रस्ता (30 लाख), पवनानगर – महागाव (30 लाख), कशाळ जोडरस्ता (30 लाख), प्रजिमा 108 ते नवीन उकसान (नाणे) रस्ता (30 लाख), शिवणे – शिंदेवस्ती (30 लाख), राज्य मार्ग 04 ते ब्राम्हणवाडी (20 लाख), रा. मा. 04 ते अहिरवडे रस्ता (20 लाख), कुसगाव खुर्द – ग्रा. मा. 60 रस्ता (30 लाख), मळवली ते बोरज रस्ता 173 (15 लाख), रा.मा. 04 ते जांभूळ-कान्हे फाटा प्रजिमा 22 जोडरस्ता (20 लाख), चांदखेड- पाचाणे रस्ता सुधारणा (20 लाख), रा.मा. 04 ते साते रस्ता (20 लाख), प्रजिमा 28 – शिवली रस्ता सुधारणा (20 लाख), प्रजिमा 105 – शिवली रस्ता सुधारणा (20 लाख), कोंडिवडे रस्ता सुधारणा (20 लाख), प्रजिमा 22 टाकवे बुद्रुक -बेलज-राजपुरी रस्ता (35 लाख), सडवली – शिवणे – डोणे रस्ता (35 लाख), आढळे खुर्द – पुसाणे (कातकरी वस्ती) रस्ता (35 लाख), बेबड ओव्हळ- प्रजिमा 105 रस्ता (35 लाख), प्रजिमा 28 ते ब्राम्हणोली रस्ता (35 लाख), करंजगाव – मोरमारेवाडी रस्ता (26 लाख), इंदोरी-पानसरे वस्ती रस्ता (25 लाख), डोंगरगाव जोडरस्ता (10 लाख). याशिवाय तीन कोटी आठ लाख रुपये निधीतून 60 गावांतील जनसुविधा अंतर्गत रस्त्याच्या कामे मंजूर करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)