पुणे : गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांची प्रतीक्षा आज संपली असून पुण्यामध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/310669969837611/
दरम्यान, मान्सून 20 ते 22 तारखेला म्हणजे दोन दिवसात सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्याप्रमाणे आज पुण्यात सायंकाळी 6.00 च्या सुमारास जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडालेली पहायला मिळाली.