चहाच्या कपावर ‘मै भी चौकीदार’चं कॅप्मेन; कंत्राटदारावर रेल्वेकडून कारवाई

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. देशात सर्वत्र सध्या जागावाटप, उमेदवारी अर्ज भरण्याची तसेच प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस आणि भाजप या मोठ्या पक्षामध्ये तर जोरदार आरोपप्रत्यारोपांच जोरदार युध्द सुरू आहे.

काँग्रेसकडून भाजपाविरूध्द गेल्या काही दिवसापासून चौकीदार चोर है असं कॅप्मेन सुरू आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने मै भी चौकीदार असं अभियान सुरू केलेलं आहे. दरम्यान, काठगोदाम शताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या चहांच्या कपवर मै भी चौकीदार असं छापण्यात आले होते. मात्र रेल्वेतील एका प्रवाशाने ट्विटरवर या चहाच्या कपाचा फोटो टाकून रेल्वेत अशाप्रकारे भाजपाकडून होत असलेला प्रचार हा निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करणारा असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांच्या या ट्विटची तातडीने सर्वत्र प्रतिक्रिया उमटली. विशेष म्हणजे रेल्वेकडूनही या प्रकाराची दखल घेतली असून यााबाबत अधिक माहिती मागवली आहे.

निवडणूकीची आचारसंहिता असताना अशाप्रकारे प्रचार होत असल्याने रेल्वेने याची दखल घेत हे कप हटविले आहेत. तसेच याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर आणि ट्रेन निरिक्षकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, अशाप्रकारे चहाचे कप रेल्वेमध्ये दिले जात आहेत, याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. तसेच फक्त याच ट्रेनमध्ये असे कप दण्यात येत आहेत की आणखी काही ट्रेनमध्ये असे चहाचे कप वाटण्यात येत आहे आहेत याची माहिती घेणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

दरम्यान रेल्वेकडून यासंबंधी कारवाई करण्यात आली असून 1 लाख रूपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच कंपनीचे नाव आर.के.असोसिएटस असल्याचे समोर येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)