34 मानवी सांगाड्यांसह रेल्वे प्रवाशाला अटक

छपरा (बिहार): बिहार राज्यातील छपरा रेल्वे स्थानकावर मानवी सांगाडे घेवून जाणा-या एका प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 16 कवट्या आणि 34 मानवी सांगाडे पोलिसांनी जप्त केले आहेत. संजय प्रसाद (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बलिया-सियालदह एक्‍सप्रेसने प्रवास करत होता.

उत्तर प्रदेशातील बलिया येथून त्याने हे सांगाडे विकत घेतले होते आणि भूतानमार्गे ते चीनला पोहोचवायचे होते, असे पोलिसांच्या चौकशीत त्याने कबुल केले आहे. पण नेमके कशासाठी या सांगाड्यांचा वापर केला जाणार होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय त्याच्याकडून नेपाळ आणि भूतानमधील चलन, अनेक एटीएम कार्ड, दोन ओळखपत्र, नेपाळचे सिम कार्डदेखील जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उप-अधीक्षक (रेल्वे) तन्वीर अहमद यांनी दिली आहे.

-Ads-

त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये तंत्रमंत्रासाठी मानवी सांगाड्यांचा पुरवठा करणाऱ्या टोळीत संजय प्रसादचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा तपास करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
574 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)