बेरोजगारांसाठी रेल्वे मध्ये मोठी संधी ; रेल्वे मंत्र्यांची घोषणा !

नवी दिल्ली: रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी बेरोजगारांसाठी मोठी घोषणा केली आहे. पियुष गोयल म्हणाले, मागच्या वर्षी आम्ही दीड लाख लोकांना नोकरी दिली होती. दरम्यान रेल्वे प्रशासनाने पुढील दोन वर्षात निवृत्त होणाऱ्या जागा आणि अन्य जागांसाठी ४ लाख रोजगार देण्याचे योजिले आहे.

रेल्वे मध्ये २ लाख ३० हजार जागा निघतील. सध्या १ लाख ३२ हजार जागा खाली आहेत. तसे पुढील दोन वर्षात १ लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्यामुळे रेल्वे प्रशासन २ वर्षात ४ लाख जागांसाठी भरती करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच २ लाख ३० हजार नवीन पदांसाठी होणाऱ्या भरतीमध्ये आर्थिक कमकुवत उमेदवारांसाठी १० टक्के आरक्षण लागू होणार आहे. ही भरती दोन टप्यात होणार असून पहिल्या टप्यात १ लाख ३१ हजार ४२८ पदांसाठी जाहिरात निघेल. ही जाहिरात फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये निघेल. त्यानंतर दुसऱ्या टप्यात ९९ हजार पदांसाठी भरती होणार आहे. २०२० मध्ये मे किंवा जून मध्ये ही जाहिरात निघेल.

https://twitter.com/PiyushGoyalOffc/status/1088024815376551936

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)