रेल्वे विस्तारीकरण प्रगतीपथावर 

नवी दिल्ली: देशात गेल्या दोन वर्षात विविध राज्यांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार करण्यात आला आहे. यात नवे रेल्वे मार्ग, दुहेरीकरण आणि गेज परिवर्तनाच्या कामांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूमी संपादन, वैधानिक मान्यता अशा अनेक बाबींसाठी मंत्रालयांबरोबरच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मान्यतांची आवश्‍यकता असते. 2016-17 या वर्षात महाराष्ट्रात अशा प्रकारे 75 किलोमीटर मार्गाचे काम झाले तर 2017-18 या वर्षात 118.88 किलोमीटर मार्गाचे काम झाले. 2014-15 ते 2017-18 या चार वर्षांच्या कालावधीत भारतीय रेल्वेने 374 नव्या रेल्वेगाड्यांची तरतूद केली. महाराष्ट्रात 39 किलोमीटर अंतराच्या नव्या रेल्वेमार्गाचे काम करण्यात आले तर 288 किलोमीटर अंतराचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)