जम्मू काश्‍मीरच्य माजी अर्थमंत्र्याच्या मुलाच्या घरावर छापे

नवी दिल्ली/ श्रीनगर- प्राप्तीकर विभागाने आज जम्मू काश्‍मीरचे माजी अर्थमंत्री अब्दुल रहिम राथेर यांचे पुत्र हिलाल राथेर यांच्या मालमत्तांवर छापे घातले. जम्मू काश्‍मीर बॅंकेतील कर्जांमधील गैरव्यवहार आणि कथित करचुकवेगिरी प्रकरणी हे छापे घालण्यात आले. श्रीनगर, दिल्ली आणि लुधियानतील एकूण 8 ठिकाणी हे छापे घालण्यात आले.

जम्मू काश्‍मीर बॅंकेतून हिलाल आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्‍तींनी घेतलेल्या कर्जामध्ये गैरव्यवहार आढळला आहे. या प्रकरणी बॅंकेतील व्यवहारांचीही प्राप्तीकर विभागकडून तसेच अलिकडेच स्थापन करण्यात आलेल्या जम्मू काश्‍मीरमधील लाच लुचपत विभगाकडून तपासणी केली जात आहे. याच प्रकरणातील पुरावे शोधण्यासाठी प्राप्तीकर विभाग आणि लाच लुचपत विभागाकडून हे छापे घालण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाच लुचपत विरोधी विभागाने यापूर्वी श्रीनगरचे उपमहापौर आणि केहवा समुहाचे संचालक शेख इम्रान, जम्मू काश्‍मीर बॅंकेचे अधिकारी आणि अन्य काही सरकारी अधिकऱ्यांविरोधात प्रकरण दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)