माळेगाव – रेशनिंगचा गहू व तांदूळ रेशन दुकानदारांकडून घेऊन त्याची सरकारी पोती बदलून दुसरे नवीन पोत्यात भरून त्याची विक्री करून काळाबाजर करणाऱ्यांचा बारामती गुन्हे शोध पोलिसांनी भांडाफोड केला आहे. वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. 17) दुपारी पोलिसांनी छापा टाकून 12 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांपैकी एकास अटक केली आहे तर इतर तिघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सौरभ सुधीर शहा असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर सुधीर जवाहरलाल शहा, अक्षय मुथा, जाफर शेख हे तिघे फरार आहेत. याबाबतची माहिती अशी की, बारामती तालुक्यातील काही रेशनिंग दुकानदार धान्य गरिबांना देण्याएवजी काळ्या बाजाराने मालाची सरकारी पोती बदलून विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस जवान संदीप जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार वडगाव येथे कारवाई करून 3 लाख 30 हजार किमतीचा 15 हजार किलो गहू, 2 लाख 70 हजार किमतीचा 13 हजार 500 किलो तांदूळ, 8 हजार 750 रुपयांची 250 किलो साखर व 47 हजार 630 रुपये रोख व टाटा कंपनीचा 909 मॉडेलचा टेम्पो, वजन काटा, पोते सील करायचे मशीन, 116 पांढरे रंगाचे सरकारी प्लॅस्टिक पोती, 52 खाकी रंगाचे सरकारी बारदान (पोती) असा एकूण 12 लाख 71 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बारामती गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे, पोलीस कॉस्टेबल दशरथ कोळेकर, विशाल जावळे, रॉकी देवकाते आदींनी
केली आहे.