जुगार अड्डयावर छापा; पाच जणांना अटक

भुईंज –  येथील बाजारपेठे जवळ चित्रावर जुगार खेळला जात असल्याची माहिती वाईचे डीवायएसपी अजित टिके यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकून दहा हजार रुपये जप्त करुन पाच जणांना अटक केली आहे. कुडाळ येथील बाजारपेठे जवळच अमिन अजित आगा (वय 26) हा गेल्या अनेक महिन्यांपासुन टेबलावर विविध प्रकारची चित्रे लाऊन त्या द्वारे जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती डीवायएसपी अजित टिके यांना खबऱ्यामार्फत मिळाली. ते स्वतः आणि

पथकातील श्रीनिवास बिराजदार एन. यू. महाडिक, पी. बी. ठोंबरे, एस. एन. वाघमळे, एच. जी. दडस, जितेंद्र शिंदे, एस. एन. ससाणे आणि कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून त्यात जुगार चालविणारा अमिन अजित आगा (वय 26) , सुनिल दत्तु जाधव (वय 45),शिवाजी रमेश रासकर (वय 33) तिघेही राहणार कुडाळ ता.जावळी, आनंदा लालु मोरे (वय 23), रामा अशोक जाधव (वय 21) दोघे राहणार जकातवाडी; सातारा यांना पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन 7 हजार 350 रुपये रोख जप्त करुन 3 हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य असा 10 हजार रुपयांचा माल जप्त केला. या पाचही जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)